महाजन अहवाल, देवाणघेवाण, तडजोड या शब्दांनाही सीमावासीयांनी थारा देता उपयोगाचे नाही. त्या वांझोट्या चर्चेमुळे जनतेत फाटाफूट मात्र होईल
पाटसकर निवाड्यापासून आपण आता सार्वमतावर आलो आहोत. महाराष्ट्र विधानसभेनेही एकमताने यास मान्यता दिली आहे. आता केंद्र सरकारची मान्यता मिळवणे बाकी आहे. ती महाराष्ट्रातील नेत्यांनी त्वरित मिळवावी यासाठी दडपण वाढवले पाहिजे. फाटाफूट निर्माण करण्याचे आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश आलेले नाही. ही आनंदाची गोष्ट आहे, पण बेसावध राहूनही भागणार नाही. मून चालणार नाही. नव्या दमाने वाटचाल करावी लागेल.......